शिक्षक भारती संघटना धुळे च्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांचा सत्कार.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व समस्या त्वरित मार्गी लावू
डॉ सुभाष बोरसे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी धुळे
धुळे प्रतिनिधी
आज दि.०६/०७/२०१९ शनिवार रोजी धुळे जिल्हा शिक्षक भारती संघटनेतर्फे मा.डॉ.श्री.सुभाष बोरसे साहेब शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जि.प.धुळे यांना शुभेच्छा देऊन स्वागत करुन धुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या, शिक्षकांच्या अडचणी, प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत अशा विविध मागण्यांकरीता सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ.श्री.सुभाष बोरसे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत शैक्षणिक समस्यांबाबत लवकरच योग्य ते निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सचिव अशपाक खाटीक, जिल्हाध्यक्ष विनोद रोकडे, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, किरण मासुळे, रणजित शिंदे, सी.टी.पाटील,संजय पाटील, कानिफनाथ सुर्यवंशी, हर्षल पवार,भरत पाटील, दिपक पाटील, नानाभाऊ महाले,शामकांत सोनवणे,आर.एम.चव्हाण, श्रीमती वंदना हालोरे, मिलिंद पाटील, सुधाकर पाटील, भुषण देवरे,रविंद्र खरवंटे, जयवंत पाटील, ए.एस.पाटील,खेमचंद पाकळे,गणेश माळी,अमृत पाटील, मनोजकुमार जाधव,इक्बाल शाह, मुस्ताक शेख सुलेमान, अमिन कुरेशी,शैलेश धात्रक इ.पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.