अमळनेर-येथील अँँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधींचा पदग्रहन व शपथविधी समारंभ उत्साहात संपन्न झाला.शालेय शिस्त टिकविण्यासाठी व शाळेतील गुणवत्ता वाढवण्यासाठी सदैव कटीबद्ध राहु.उद्या ची सक्षम पिढी घडविण्यासाठी व राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काम करण्याची शपथ यावेळी प्रतिनिधींना देण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील,प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी देवेंद्र पाटील,विद्यार्थीनी प्रतिनिधी सोनम वर्मा,क्रिडा विभाग प्रमुख महेश पाटील,उपप्रमुख सागर पावरा,खुशी ढोले,सांस्कृतिक प्रमुख सानिका पवार,उपक्रम प्रमुख जानवी पाटील,ब्लु हाऊस कॅप्टन आदित्य शेलकर,ग्रिन हाऊस कॅप्टन स्नेहा बठेजा,रेड हाऊस कॅप्टन भुपेश पाटील,सॅफराॅन हाऊस कॅप्टन वैष्णवी पाटील ह्या विद्यार्थ्यांना यावेळी प्राचार्य विकास चौधरी यांनी शपथ दिली.
सुत्रसंचालन मेघा पाटील यांनी केले तर आभार एस जे पठाण यांनी मानले.क्रिडाशिक्षक व्हि एन सुर्यवंशी,एम ए पठाण,शारदा महिंद,विकास चौधरी,नागराज माळी,जितेंद्र वाणी,दुष्यंत करसकर,मनिषा वाल्हे,केदार देशमुख,गणेश सातपुते उपस्थित होते.