Halloween party ideas 2015


*शिक्षकांना मूळगावी जाण्यास परवानगी द्या- अनिल बोरनारे*

*भाजपा शिक्षक आघाडीची राज्यशासनाकडे मागणी*

मुंबई (प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०१९-२० एप्रिल अखेर संपत असून त्यानंतर अधिकृतरित्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्याने शिक्षकांना त्यांच्या मूळगावी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीने राज्यशासनाकडे केली आहे
भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू असून जिह्याच्या बाहेर प्रवासास बंदी करण्यात आली आहे. शाळांना उन्हाळी सुट्टी २ मे पासून आहे. उन्हाळ्यात दीर्घ सुट्ट्या असल्याने अनेक शिक्षक वर्षातून एक वेळा आपल्या मूळ गावी जातात. आई-वडिलांची भेट घेतात परंतू लॉकडाऊन मुळे प्रवासास बंदी आहे त्यामुळे शिक्षकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यास विशेष परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.