Halloween party ideas 2015


ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न ८ दिवसात निकाली काढणार

भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या मॅरेथॉन सहविचार सभेत शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही

*आमदार संजय केळकर, भाजपा नेते संदीप लेले यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

ठाणे ५ जुलै (प्रतिनिधी) भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी कोकण विभागाने शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मांडलेले सेवाशर्तीचे प्रश्न तसेच शालेय शिक्षण विभागाच्या धोरणात्मक निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून ८ दिवसात  तातडीचे प्रश्न तर उर्वरित सर्व ३१ जुलै पर्यंत सोडविण्यात येतील अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी आज भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीला दिली असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. *या सभेला आमदार संजय केळकर, भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी कोकण-मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर संयोजक संदीप कालेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शब्बीरभाई शेख, बी.पी. घेरडे, सुभाष अंभोरे, विजय धनावडे, कल्याण शहराध्यक्ष विनोद शेलकर, प्रभाकर बोरसे यांच्यासह अनेक पदाधिकारी* व ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते
*सभेची सुरुवात अनिल बोरनारे यांनी करून आधी ठाणे जिल्ह्यातील धोरणात्मक व सामूहिक प्रश्नांना सुरुवात केली* त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात शालार्थ मध्ये आलेल्या अडचणी व *वेतनास होणारा विलंब, आर टी ई मान्यता, वेतनेतर अनुदानाचे वाटप, ठेव संलग्न योजनेअंतर्गत मृत कर्मचाऱ्यांचे धनादेश वाटप, अनुकंपा प्रकरणे, पीएफ निधीची अग्रीम प्रकरणे,वैद्यकीय प्रतिपूर्ती, प्रलंबित शालार्थ आयडी प्रकरणे,शिक्षकांना सेवाजेष्ठता यादी व सेवा पुस्तकांची दुय्यम प्रत देणे, दरमहा पगाराची स्लिप देणे याबाबत ८ दिवसात निर्णय घ्यावा असे अनिल बोरनारे यांनी सुचविले असता शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्य केले. यानंतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षक-शिक्षकेतरांचे सेवासातत्य प्रकरणे, वैयक्तिक मान्यता,सेवाजेष्ठता बाबतचे आक्षेप, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक पदांना मान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी* तातडीने देण्याबाबत आग्रह धरण्यात आला. हे सर्व प्रश्न १५ दिवसात निकाली काढण्याची आग्रही मागणी अनिल बोरनारे यांनी केली असता शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आली.

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीबाबत लवकरच स्वतंत्र बैठक

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हा गुणवत्तेबाबत अव्वल करण्यासाठी सर्व विषय संघटनांची बैठक आयोजित करून पीएसएम वर चर्चा घडवून आणण्याची मागणीही अनिल बोरनारे यांनी केली असता शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आली व लवकरच सर्व विषय संघटनांची याबाबत बैठक घेण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.