*आशिया खंडातील मुलींची पहीली शाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करा-नरेंद्र बागुल*
धुळे प्रतिनिधी
देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा हि प्रसिद्ध आहे महात्मा जोतीराव फुलेंनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचविली ज्या फुले दाम्पत्यांनी अनेक अडीअडचणींना सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिले त्या भिडेवाड्याची आज अवस्था खूपच दयनीय झालेली आहे.या ठिकाणची दुरावस्था होणे तमाम फुले प्रेमी अनुयायांसाठी वेदनादायक आहे या वास्तूस राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे हि मागणी शासनाकडे वेळोवेळी करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून शासनाने पहिली मुलींची शाळा भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक लवकरच घोषित करावे.तसेच राज्यात कोविड -१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे शासकिय रुग्णालयांत इतर आजारांच्या रुग्णांना जागा उपलब्ध होत नाही अशा वेळी खाजगी रुग्णालयात रुग्णांना नेले असता कोविड-१९ च्या भितीपोटी राज्याच्या बहुतांश ठिकाणी डाॅक्टर उपचार करत नाही अशाने उपचारा अभावी बऱ्याच नागरिकांना आपला जिव गमवावा लागत आहे तरी सदर विषयात लक्ष घालुन सर्व जिल्हांत प्रत्तेक आजारांवर काळजीपुर्वक उपचार केले जातील यासाठी राज्याचे प्रमुख म्हणुन आपण कठोर निर्णय घ्यावेत व सर्वच प्रकारच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळतील याची व्यवस्था करावी. अशा आशेचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री ,उध्दव ठाकरे यांना बागलाणचे तहसिलदार श्री.इंगळे (पाटील ) यांच्या मार्फत महात्मा जोतीबा फुले युवा मंच,आॅल इंडीयाचे महासचिव नरेंद्र बागुल यांनी दिले निवेदन देण्यासाठी नाशिक जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत बागुल,महेश मोरे उपस्थित होते.
फोटो
