शिक्षकांचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी -शिक्षण सभापती श्री रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन*
'' आपला जिल्हा -आपले उपक्रम '' डिजिटल बुकचा भाग दोन चे शिक्षण सभापती श्री रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव प्रतिनिधी
आपला जिल्हा आपले उपक्रम भाग दोन या डिजिटल बुक चे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या ऑनलाईन सभेत प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी या ई -पुस्तकातील शिक्षकांचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील असे शिक्षण सभापती श्री रवींद्र पाटील यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे व उपशिक्षणाधिकारी डॉ डी एम देवांग,उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली *आपला जिल्हा आपले उपक्रम हे ई-पुस्तक* तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉक डाऊन च्या काळात राबविण्यात आला होता .या पुस्तक प्रकाशन प्रसंगी शिक्षण व क्रीडा समिती सभापती श्री रवींद्र भाऊ पाटील, श्री पोपट तात्या भोळे, श्री गजेंद्र भाऊ सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री भाऊसाहेब अकलाडे , शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री भास्कर पाटील , शिक्षणाधिकारी निरंतर श्री किशोर पाटील सो, शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पवार, श्री राजेंद्र सपकाळे, श्रीमती सरला पाटील, स्वीय सहाय्यक श्री कांतीलाल पाटील श्री संदीप पवार, श्री राहुल चौधरी, श्री सुनील दाभाडे, कक्ष अधिकारी श्री डी एन वाणी, लेखाधिकारी श्री शामकांत
न्याहाळदे इत्यादी उपस्थित होते.
ई -पुस्तक तयार करण्याची संकल्पना पाचोरा तालुक्याच्या राजुरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत व शहापुरा शाळेचे उपशिक्षक पंकज पालीवाल यांनी मांडली होती . प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आयटी सेल ची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत इ - बुक संपादनाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी सांभाळली व त्यांना संभाजी हावडे उपशिक्षक जि .प.शाळा पाळधी तालुका जामनेर यांनी सहकार्य केले .उपक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचन्द भाऊ पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र भाऊ पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील , डायट प्राचार्या श्रीमती मंजुषा क्षीरसागर , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी जे पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी
के ए पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.
या पुस्तकाचा पहिला भाग यापूर्वी प्रकाशित झाला असून शिक्षकांनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. भाग दोन या पुस्तकातही शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने
जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे. डिजिटल बुक भाग दोन पुस्तकाच्या निर्मिती साठी राजेंद्र कोळी ,श्रीमती सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, श्रीमती विजया पाटील ,श्रीमती कल्पना पाटील , संदीप पवार , राहुल चौधरी , सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील, विलास निकम, ईश्वर महाजन इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले.तसेच जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले असून पुस्तक निर्मिती कार्यात मधुकर घायदार संपादक शिक्षक ध्येय यांचे विशेष सहकार्य मिळाले.
