भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक घोषित करा युवा मंचाची मागणी
क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी सुरू केलेल्या देशातील पहिली शाळा भिडेवाडा हे शासनाने तत्काळ भू संपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करून लवकरात लवकर विकसित करणेबाबत महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया ता. चाळीसगाव यांच्या वतीने मा तहसीलदार अमोल मोरे साहेब यांना देण्यात आले महात्मा ज्योतिराव फुले यांनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहोचवली ज्या फुले दाम्पत्याने अनेक अडचणींचा सामना करून विरोध पुकारून देशात मुलींसाठी भिडेवाडा मधून शिक्षणाची दारे खुले करून दिली. सदर जागा शासनाने भूसंपादन करून फुले प्रेमी जनतेला न्याय द्यावा. शासनाकडे वेळोवेळी करून देखील शासन या कडे दुर्लक्ष करत आहे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरात लवकर घोषित करून विकसित करावे अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी महात्मा जोतिबा फुले युवा मंच ऑल इंडिया चे पदाधिकारी लक्ष्मण महाजन, भगवान रोकडे, दिनेश महाजन, भगवान महाजन, नाना माळी, प्रशांत खलाणे, ता अध्यक्ष शैलेंद्र सोनवणे, मनोज महाजन, गोविंद वाघ, सागर मोरे, सुरेंद्र महाजन इत्यादी फुले शाहू अंबेडकर विचारवंत/प्रेमी उपस्थितीत होते.
