आधार संस्था व विप्रो केअर्स यांच्या
सहाय्याने आधार आरोग्य प्रकल्पास सुरुवात
अमळनेर प्रतिनिधी
आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर व विप्रो केअर्स यांच्या सहाय्याने शहरातील 6 विभागामध्ये आधार आरोग्य प्रकल्प राबविला जात आहेत.ज्यांचेऔपचारीक उद्घाटन प्रकल्पात नव्याने समावेशित अंदरपुरा भागात करण्यात आले मागील 5 वर्षापासुन प्रकल्पात ताडेपुरा,रूपजीनगर,शांतीनगर,गांधलीपुरा,
भोईवाडा-कसाली मोहल्ला हे भाग समावेशित जागतीक महामारीच्या संदर्भाने सदर भागांमध्ये विशेष आरोग्यसेवा प्रकल्पाव्दारे पुरविण्यात येणार आहेत.
सदर प्रकल्पांअतर्गत आठवड्यातुन
एक दिवस बाहयरुग्ण तपासणी
महिन्यातुन एक दिवस गरोदर माता तपासणी ० ते 6 वर्षापर्यत बालकांची
आरोग्य तपासणी व उपचार माता बाल आरोग्य व जाणीव जागृती परीसर
स्वच्छता कार्यक्रम वस्तीतील नागरीकांना आरोग्याच्या विविधसेवा उपलब्ध करून
दिल्या जातील.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अमळनेर चे तहसिलदार श्री.मिलीद वाघ,नगरपालीकेच्या मुख्यधिकारी डॉ.विदया गायकवाड याच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन आधार संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील,कार्यकारी संचालक रेणु प्रसाद, नगरपालीका प्रशासन अधिकारी संजय चौधरी,मेडीकल ऑफिसर डॉ.सुशिलकुमार बडगुजर, प्रा.जयश्री साळुखे मान्यवर उपस्थित होते.
आधार संस्था व विप्रो केअर्सयांच्या सहाय्याने अमळनेर करांना मागील 5
वर्षापासुन आरोग्याची मोफतसेवा मिळत आहे व कोविड-19 या माहामारीत
देखिल संतुर साबणाचे वाटप ग्रामीण व शहरी भागात केली असुन त्यांच्या
फायदा झाला असे कार्यक्रामांच्या प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील यांनी मांडले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार मिलींद वाघ व नगरपालीकेच्या मुख्यधिकारी डॉ.विदया
गायकवाड यांनी अंदरपुरा मोहल्यातील नागरीकांना आव्हाने केली की,दवाखान्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व कोरोना संसर्ग होवू नये म्हणुन मास्क, सॅनिटायझार, सोशल डिरंटनचा उपयोग करावा.
सदर कार्यक्रमास आधार संस्थेचे कार्यकर्ते अश्विणी भदाणे, वैशाली शिंगाणे, कलीम
खान, तौसीफ शेख, वैशाली वानखेडे व अंदरपुरा भागातील सर्व नागरीक
उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार जावेद अख्तर यांनी मांडले.
