Halloween party ideas 2015


भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या तालुका समन्वयक पदी भाग्यश्री कासार यांची नियुक्ती....!

प्रतिनिधी अमळनेर-

नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या अमळनेर तालुका समन्वयक पदी भाग्यश्री कासार यांची निवड करण्यात आली, सदर निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दत्तात्रय मूर्ती रामु व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.त्रेविनिकुमार कोरे, प्रदेश अध्यक्ष राहुल वाकलकर यांच्या हस्ते देण्यात आले.
भाग्यश्री कासार ह्या प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थीनी असुन राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या माध्यमातून त्यांनी आज तागायत अनेक सामाजिक उपक्रम तसेच जनजागृतीचे काम केले आहे, NSS मध्ये त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेस्ट व्हॅलेंटीअर म्हणुन गौरविण्यात आले आहे, आता भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे मनोदय भाग्यश्री कासार यांनी व्यक्त केला आहे.
भाग्यश्री कासार यांच्या निवडीबद्दल विविध स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्याच बरोबर अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्षा अंकिता पाटील, तालुका सचिव मयुरी माळी यांनी भाग्यश्री कासार यांचे निवडी बद्द्ल स्वागत केले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.