पीटीए संघटनेने दिली प्रकाशाची वाट.
अमळनेर प्रतिनिधी- पिळोदयाच्या
दाम्पत्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांचे भावी आयुष्य अंधकारमय झाल्याचे दिसत होते .या दोघा भावंडांना अंमळनेर खाजगी क्लासेस संघटनेने मायेचा आधार देत भावी जीवनाला प्रकाशाची वाट करून दिली .या संघटनेने निराधार दोघं भावंडांना दत्तक घेऊन त्यांच्या उज्ज्वल शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. अमळनेर खाजगी क्लासेस संघटनेने दाखवलेली माणुसकी कौतुकास्पद आहे.
अमळनेर तालुक्यातील पिळोदे येथील तरुण शेतकऱ्याने व त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण अमळनेर तालुका हादरला होता. त्यांना दोन मुले होती. एक मुलगा आठवीत, तर एक मुलगा चौथीत .इतक्या लहान वयामध्ये आई-वडिलांचे छत्र हरवल्यामुळे या मुलांना शिक्षणात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून खाजगी क्लासेस संघटनेचे भैय्यासाहेब मगर, विनोद जाधव ,संजय पाटील व त्यांचे पदाधिकारी यांनी पिळोदे येथे भेट देऊन परिवाराचे सांत्वन केले. व एक पाऊल पुढे जात एक सामाजिक बांधिलकी जोपासून त्या दोन्ही भावंडांची
पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली असल्यामुळे खाजगी क्लासेस संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.