अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : येथील क्षत्रिय फुल माळी समाज संस्थेची विश्वस्थांची अतिमहत्वाची बैठक पार पडुन पदाधिकारी निवडीचा निर्णय घेण्यात आला तर अध्यक्ष म्हणून दिलीप आत्माराम पाटील(माळी) उपाध्यक्ष दिनेश माळी सचिव उदय ओंकार खैरनार सह सचिव गोकुळ गोविंदा बागुल खजिनदार महेश पांडुरंग माळी यांची एक मताने निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे विश्वस्थ क्रांतीसुर्य महात्मा फुले विचार मंच चे संस्थापक प्रविण बी.महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक अँड सुरेश सोनवणे,अँड.नगराज माळी,आर.एस.माळी,प्रवीण महाजन, खेमराज बोरसे, विजय माळी आदी विश्वस्थ उपस्थित होते नुकतीच संस्थेची सर्वसाधारण सभा झाली होती त्यात विश्वस्थांची निवड होऊन दुसऱ्या दिवशी तातडीची बैठक आयोजित करून विश्वस्थांची पदाधिकारी निवड केली आहे.या निवडी बद्दल सर्वस्थरातून त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव होत आहे. फोटो
: क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेचा पदभार नुतन सचिव उदय खैरणार यांना सोपवतांना गोकुळ बागुल सोबत नगरसेवक अँड.सुरेश सोनवणे,दिनेश माळी, प्रवीण महाजन आदी.