Halloween party ideas 2015

शारदा हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक राजेंद्र सूर्यवंशी यांना उत्कृष्ट स्काऊट पुरस्कार जाहीर.

राज्यपालांच्या हस्ते मुंबई येथे १२ जुलैला होणार पुरस्कार वितरण.

अमळनेर प्रतिनिधी- शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील उपक्रमशील शिक्षक उत्कृष्ट स्काऊट शिक्षक यांना नुकताच त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे उत्कृष्ट स्काऊट गाईड पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
    राजेंद्र सुर्यवंशी यांना राज्यस्तरीय ऊत्कृष्ठ स्काऊटर पुरस्कार जाहीर झाला आहे.दि.१२ जुलै रोजी राज्यपाल महामहीम श्री विद्या सागर राव यांच्या दादर  मुंबई येथे पुरस्कार वितरण होणार असून,सपत्नीक सत्कार करणेत येईल.
     अत्यंत आनंदाची ५६ इंच छाती फुगवणारी बाब आहे.राष्टपती,पंतप्रधान ढाल नंतर हा आपल्या संस्थेच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.श्री.डी.डी.राजपूत सर व श्री सुर्यवंशी यांच्या कामाची ,परिश्रमाची ही पावती आहे. असे कळमसरे येथील जेष्ट पत्रकार,
 माजी सरपंच व शारदा माध्यमिक विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी जी.टी.टाक  यांनी सांगितले.
             पुरस्कारथीँ शिक्षक
राजेंद्र सूर्यवंशी यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बांधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.