सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या वतीने रविवारी सत्कार समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
आपल्या विकास पॅनलचे सर्व जेष्ठ श्रेष्ठ प्रणेते ग्रंथालय संचालक
विकास पॅनेलचे मुख्य प्रवर्तक सन्माननिय श्री.आबासाहेब शामकांत भदाने यांची जळगांव जिल्हा गं.स.बॅंकेच्या ऊपाध्यक्षपदी निवड झाली,तसेच विकासपॅनलचे खंदेपुरस्कर्ते,मार्गदर्शक डाॅ.श्री.राजेंद्र पिंगळे यांची अ.भा.सुवर्णकार समाजाच्या जळगांव जिल्हा डाॅ.सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली तर श्री.भैय्यासाहेब मगर सर,संचालक साई अँँकेडमी,अमळनेर यांची महाराष्र्ट राज्य खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली या मान्यवरांचा तसेच पूज्य सानेगुरूजी ग्रंथालयाचे सभासद श्री.विजय शिवाजी वाघ,प्रा.शिक्षक शिरसाळे हे नुकतेच प्रदिर्घ सेवेतुन सेवानिवृत्त झालेत त्यांनी सेवानिवृत्तीदिनी ग्रंथालयांस रु.५०००/-देण्याचे जाहिर केलेले आहे यानिमित्ताने या सर्व मान्यवरांचा ग्रंथालयातर्फे सत्काराचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या सभागृहात
दि.०७/०७/२०१९ रविवार रोजी सकाळी ९-३० वाजता आयोजित केलेला आहे. तरी सर्व संचालक मंडळांची उपस्थिति प्रार्थनिय आहे. असे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपजी सोनवणे व चिटणीस प्रकाश वाघ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.