महाजन हायस्कुल येथील विद्यार्थी व पालकांनी केले उपक्रमाचे कौतुक.
धुळे-सध्या कोरोणा विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन असल्यामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.इयत्ता 1 ली ते 8 पर्यंत उत्तीर्न करण्याचे आदेश असले तरी ह्या शैक्षणिक वर्षात इ 10 वी मधे प्रवेश करणारे विद्यार्थी चिंतीत झालेले दिसुन येतात कारण एप्रिल किंवा मे महिन्यातच त्यांचा पुढील वर्षांचा दहावीचा अभ्यासक्रम सुरु होत असतो.म्हणुन लाॅकडाऊन मुळे विद्यार्थ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी व शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भिलाली ता अमळनेर येथील रहिवासी व सध्या देवपूर धुळे येथील महाजन हायस्कूल येथे कार्यरत असलेले श्री विजय भाऊराव पाटील (व्ही बी पाटील सर) यांनी एक अनोख्या उपक्रमाने आपल्या पेशाविषयी निष्ठा दाखवत आपली नैतिक जबाबदारी पार पाडली आहे.
सुरुवातीला ते शिकवत असलेल्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा व्हाॅट्स अॅप गृप तयार करण्यात आला त्यामधे मुलांचा व मुलींचा असे दोन वेगवेगळे गृप तयार करण्यात आले.व त्यामधे उपक्रमासंबधी पूर्वसूचना देत गृपमधे अपडेट राहण्याच्या व गृपमधील शिस्तीविषयी सुचना दिल्या.त्यानंतर रोज एका घटकाचे वर्गात शिकवितो त्याप्रमाणे घरी असलेल्या फळ्यावर शिकविण्याचा मोबाईल मधे व्हिडोओ करुन तो व्हिडिओ ते रोज त्या व्हाॅट्स अॅप गृपमधे टाकतात.त्यानंतर दिलेल्या वेळेत विद्यार्थी तो व्हिडिओ डाऊनलोड करुन वर्गात बसल्यासारख लक्ष केंद्रित करुन ते आत्मसात करतात.यानंतर ते सर्व आपल्या वहीत लिहुन सोडविलेले उदाहरणे किंवा अडचणी गृपमधे टाकतात.मग विजय पाटील सर ते चेक करुन बरोबर असल्यास व्हाॅट्स अॅप चिन्हांमधील बरोबर चिन्हाच्या वापराने बरोबर देतात व चुकीचे असल्यास लाल मार्कने सर्वांसमोर गृपमधे मनोधैर्य खचू नये म्हणुन गोल मार्क करुन तात्काळ अडचण सोडविली जाते.काही विद्यार्थ्यांनी कंटाळा करु नये म्हणुन केव्हाही कोणत्याही विद्यार्थ्यांला व्हिडिओ काॅल करुन वही चेक करतात.त्यामुळे विद्यार्थी न चुकता अभ्यास करतात व वही पूर्ण करतात.यामुळे त्यांच्या विषयात विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होऊन गणित विषयाची चिंता व भिती दुर होण्यास मदत होत आहे.
व्हि बी पाटील सर यांनी सुरु केलेल्या उपक्रमा बद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले असुन.लाॅकडाऊन चा सदुपयोग करुन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करुन त्यांची ज्ञानाची तहान भागवणे हे माझ नैतिक कर्तव्य असुन शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटीबद्ध राहील व महाराष्ट्रात कोणालाही गणित विषयाची भिती किंवा शंका असेल तर माझ्या हया 8329977510 नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन श्री विजय पाटील सर यांनी केले आहे.
