देवगांव देवळीचा ग्राम पंचायत जवळचा हायमस्ट लाईट गेल्या अनेक दिवसापासून बंदच.
ऐन पावसाळ्यात हायमास्ट लाईट बंद मुळे परिसरात अंधार.
हायमास्ट लाईट सुरु करावा देवगाव देवळी ग्रामस्थांची मागणी.
देवगांव देवळी ता.अमळनेर प्रतिनिधी
(शिवाजी महाजन)
सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे जो तो पाऊस चालू असतांना आपापल्या घरात बसलेले व झोपलेले असतात पहिले काही महीन्यापूर्वी गावात चार ते पाच ठिकाणी चोरांनी घरफोडी केली आहे त्यामुळे गावात एकप्रकारे भीतीचे सावट पसरलेले आहे तरी सदर लाईट गेल्या दोन,तिन महिने पासून बंद आहे,त्यामुळे ग्राम पंचायत आवारात व आजूबाजूचा आवारात रात्री खूप अंधार असतो आणी समोरून कोण येत आहे व जात आहे हे एकमेकांना काहीच दिसत नाही .आणी अंधार असल्यामुळे जन-जनावरांचा धाक असतो आणी त्या रस्त्याने अनेक महिला,पुरुष लहान मुले वापरत असतात आता पावसाळा चालू आहे आणी त्या भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी,चिखल मोठ्या प्रमाणात साचले आहे रात्रीचा वेळेत अंधारात पाय घसरने,चिखलात पडणे अशी घटना घडण्याच्या या पहिले ग्राम पंचायतने लक्ष देऊन लवकरात लवकरच हायमस्ट चालू करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे