*कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने कृषीदिन साजरा*
आज १ जुलै महाराष्ट्र कृषी दिन निमित्त कृषी क्षेत्रातील अवगत असलेल्या " कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या " माध्यमातून अमळनेर तालुका कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या सदस्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मदतीने कृषिदिन साजरा केला गेला. आपल्या अन्नदात्या शेतकऱ्या प्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने कृषी युवाशक्ती चे संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली आणि संघटनेच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडला. या उपक्रमात शेतकर्याला लिंबु ची रोपे देण्यात आली या माध्यमातुन शेतकर्याचे आर्थिक उत्पन्र वाढेल व त्या झाडांची संगोपनाची जबाबदारी संघटनेनी घेतली आहे या वेळी तालुकाध्यक्ष गिरीष अनिल पाटील व समाधान पारधी सर. भुपेंद्र सुनिल पाटील उपस्थित होते

