Halloween party ideas 2015


मंठा जि.जालना येथील पिडीत नवविवाहिता वैष्णवी गोरे हत्या प्रकरणी चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा दया.

जिल्हा पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे
विविध संघटनेच्या पदाधिकारी यांची मागणी


जालना प्रतिनिधी
मंठा जिल्हा जालना येथील पिडीत नवविवाहिता वैष्णवी नारायण गोरे हत्या प्रकरणी सखोल चौकशी करून सबधित आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून योग्य रितीने तपास होऊन आरोपी शेख अल्ताफ बाबू यास कठोर शिक्षा व्हावी म्हणून आपण कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून विशेष लक्ष केंद्रित करुन माळी समाजातील अंत्यत गरीब परिस्थितीत आपल्या दोन मुलांना संभाळून जीवन जगणाऱ्या नारायण गोरे यांच्या नवविवाहित वैष्णवी चा मंठ्यातील गुंड शेख अल्ताफ यांने अमानुष पणे भर बाजरपेठेत धारदारशस्त्राने गळा चिराडुन केलेली हत्या लोकशाही ला काळीमा फासविणारी आहे या घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून जिल्हा चे कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक म्हणून आपणास नम्र विनंती करतो की सदरील आरोपींना फास्ट कोर्टात प्रकरण देऊन आरोपी स फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी चौकशी निपक्ष पाती व्हायला हवी करिता हे निवेदन सादर
सदरील प्रकरणी अजून कोणी सहभागी असेल तर त्याना सुध्दा सह आरोपी करून पिडीत गोरे कुंटुबियाना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती.
रावसाहेब अंभोरे .(9423729740) संयोजकमाळी समाज प्रबोधनी मराठवाडा, जनार्दन रामकिसन झोरे सामाजिक कार्यकर्ते गणेश धनवाई सरपंच ग्रा प टेंभुर्णी
प्रदिप विलासराव मुळे उपसभापती प स जाफाबाद संजय भगवान राऊत माळी महासंघ अध्यक्ष रविंद्र त्र्यबंक उखर्डे तालुकाध्यक्ष समता परिषद यांनी केली आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे महाराष्ट्र राज्य ,मा राजेश टोपे , पालकमंत्री जालना,पोलीस आयुक्त मुंबई,
जिल्हा अधिकारी साहेब जालना यांना निवेदनाच्या प्रति पाठवल्या आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.