अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दि.1/7/2020 रोजी ठिक 9.00 ते 10.15 या वेळेत गडखांब केंद्राची Say Namaste app द्वारे मुख्या.व शिक्षक यांची ऑनलाईन मिटिंग घेण्यात आली.मिटिंग साठी 66 जणांची उपस्थिती होती. मिटिंगमधून दि15/6/2020 & 24/6/2020 च्या GR चे मुद्देनिहाय सविस्तर वाचन करुन मार्गदर्शन
केंद्रप्रमुख अरूण मोरे यांनी केले.
,त्यानुसार चर्चा व समुपदेशन करण्यात आले. शाळापूर्व तयारी बाबत आढावा घेण्यात आला. आँनलाईन शिक्षणाची माध्यमे,दिक्षा अँप, टि.व्ही, android mo., रेडिओ या माध्यमातून शाळेविना शिक्षण विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. शापोआ,गणवेश,दाखलपात्र विद्यार्थी,शाळा बाह्य विद्यार्थी राहणार नाही यासाठी दक्षता, प्रवेश प्रक्रिया,यांसारखे विषयावर चर्चा झाली.
आँनलाईन मिटिंग चा प्रयोग नव्याने असल्याने शिक्षक व मुख्या.यांच्यात एक वेगळा उत्साह व सहकार्य दिसून आले.मिटिंग यशस्वीते
साठी श्री सुधाकर पाटील, विठ्ठल पाटील, खेमचंद्र पाटील ,ज्योती पाटील, कैलास माळी यांनी प्रयत्न केले.व केंद्रातील पहीलीच आँनलाईन सहविचार मिंटीग असल्याने प्रशिक्षणातील होणाऱ्या त्रुटी पुढील सभेत दुर होतील. एकंदरीत चांगला प्रतिसाद शिक्षकांनी देत त्यांनी सहकार्य केले.अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांनी केंद्राचे अभिनंदन केले.