Halloween party ideas 2015

🚩🚩 *महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना* 🚩🚩

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाईल दुरुस्तीसाठी २५०० रूपये मिळणार.*

*राज्य अभिसरण समितीच्या बैठकीत निर्णय*

*राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांना दिलासा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अमळनेर प्रतिनिधी
राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका आणि तांत्रिक मनुष्यबळ यांना मे २०१९ मध्ये कामकाज करण्यासाठी राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत मोबाईल फोन पुरविण्यात आले आहेत. या मोबाईल फोन मध्ये मध्यवर्ती शासनामार्फत निर्माण केलेले कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. गेल्या एक वर्षापासून अंगणवाडी केंद्राचे या सॉफ्टवेअर मध्ये कामकाज सुरू आहे.
मोबाईल फोन व बँटरी यांच्या करीता दोन वर्षाचा वॉरंटी कालावधी आहे.सदर वॉरंटी कालावधीत येणाऱ्या सर्व बाबी पुरवठादारामार्फत प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त असलेल्या सर्व्हिस सेंटरमार्फत सेवा देण्यात आली आहे.परिणामी वॉरंटी मध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा मोबाईल दुरूस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत होता. याबाबत संघटनेने सततपणे शासन तसेच मा.आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या कडे पाठपुरावा सुरू होता.
सदरचा विषय राज्य अभिसरण समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला.त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.ज्या बाबी वॉरंटीमध्ये येत नाहीत अशा दुरूस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून न घेता तो आयुक्तालय स्तरांवर करण्यात यावा आणि एका मोबाईल फोन दुरूस्ती साठी २५०० रूपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही.असा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.
अंगणवाडी सेविका सुमारे एक वर्षापासून अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज मोबाईल फोनच्या माध्यमातून करत आहेत. परंतु सदर मोबाईल नादुरुस्त झाल्यास दुरूस्तीचा खर्च त्यांना स्वतः करावा लागत होता.यासाठी संघटनेने सतत पाठपुरावा करून मोबाईल दुरूस्तीची २५०० पर्यंतची रक्कम शासनाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
*सदर निर्णयामुळे संघटनेच्या मागणीला यश आले असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्यासह रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे, गजानन थळे,सुमंत कदम, दत्ता जगताप,सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यांनी कळविले आहे.



WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.