अमळनेर नगरपरीषदच्या हद्दीतील पाचपावली चौक ते वडचौकापर्यतचा रस्ता झाला चकाचक
लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांचे मानले स्थानिक नागरिकांनी आभार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद हद्दीतील राज्यमार्ग १५ (पाचपावली चौक ते वडचौकापर्यंतच्या) रस्त्याची दुर्दशा झालेली होती.परीसरातील जनतेची प्रलंबित मागणीचा मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांनी नगरपालिकेमार्फत सदर रस्ता रुंदिकरण, दुभाजक,गटारीसह,काँक्रीटीकरण व विद्युतीकरणाचे काम टप्पा १ नुसार राज्यमार्ग १५ ते डाॅ.वैद्य यांचे हाॅस्पिटलपर्यंतचे काम पुर्णत्वास आल्यामुळे रस्त्याचे व पथदिव्यांचे लोकार्पण करुन मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील,पोलीस निरीक्षक,श्री.अंबादास मोरे,नगरपरिषद गटनेते श्री.प्रविण पाठक यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले.तद्नंतर परीसरातील व्यावसायिक व नागरीकांनी सदर विकासकामाबाबत समाधान व्यक्त करत मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतांना नगरसेवक बाळासाहेब संदानशिव,धनु महाजन, पंकज चौधरी,विक्रांत पाटील, प्रशासन अधिकारी, श्री.संजय चौधरी,अभियंता श्री.संजय पाटील,आरोग्य निरीक्षक श्री.युवराज चव्हाण,जितेंद्र कटारीया,बाळू माने, दिपक मद्रासी, तसेच परीसरातील व्यापारी नागरीक उपस्थित होते..

