Halloween party ideas 2015

अमळनेरात कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ऐरणीवर

कोरोना विषाणूने अमळनेर शहरात कहर माजवत अनेक जणांचे बळी गेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये. म्हणून शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तोंडी आदेश देऊन कोरोना सर्व्हेचे काम दिले आहे. प्रशासनाच्या तोंडी सुचनेनुसार अंगणवाडी कर्मचारी गेल्या ३ महिन्यापासून जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य विषयक माहिती संकलन करून दररोज न.पा.आरोग्य विभागास देत आहेत.दि.१७ जुन रोजी अलका चौधरी अंगणवाडी मदतनिस ह्या कोरोनाचे नियमित काम करण्यासाठी रूबजी नगर येथे गेल्या असता तेथील रहिवाशांनी त्यांना घेराव घालून कामाला मज्जाव करत धमकावले आणि तेथून हाकलून लावले.त्यामुळे श्रीमती चौधरी ह्या धास्तावल्या आहेत.सदर प्रकाराबद्दल त्यांनी त्याच दिवशी न.पा.वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली.परंतु सदर तक्रारीची आजतागायत कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करत असताना या महिला कर्मचाऱ्यांबाबत काही विपरीत घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रांताधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार न.पा.आरोग्य विभाग घ्यायला तयार नाहीत.त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासन घेत नसेल तर अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही क्षणी कोरोनाचे काम बंद करतील. असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.