*नांद्री येथे सामाजिक अंतर राखत पार पाडला विवाह सोहळा*
अमळनेर- तालुक्यातील नांद्री येथे माळी समाजाचा घरगुती वातावरणात ठरावीक आप्तेष्ट व तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांचा उपस्थितीत सामायिक अंतर व नियमांचे काटेकोर पालन करीत आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.
नांन्द्री येथील रहिवाशी हिरालाल शिवलाल महाजन यांचे द्वितीय चि. सचिन तसेच हिंगोणे ता.धरणगाव येथील विजय पंडीत पाटील यांची कन्या चि.सौ.का.हर्षा यांचा विवाह दि.18मे रोजी ठरला होता मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान दोन्हीकडील नातेवाईकांनी मध्यस्थी करत साध्या पद्धतीने आज दि.11 जून रोजी घरगुती वातावरणात सामाजिक अंतर व सुरक्षिततेचे नियम पाळून हा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी समाजात ज्या ज्या वेळेस असे विवाह सोहळे पार पडतात ते खरच नेहमी कौतुकास्पद ठरत असतात.विवाह सोहळातील नाहक खर्च वाचविल्यास कोणीच कर्जबाजारी होणार नाही.समाजाने अशा विवाह सोहळ्याचा आदर्श घ्यावा जेणेकरून मुलीचे वडील अथवा मुलाचे वडील यांचा अनावश्यक खर्च वाचेल व त्यातून काही रक्कम समाजपयोगी कामांसाठी उपयोग होईल. विवाहपोटी अनेक जण कर्जबाजारी होतात व आत्महत्या करतात ही वेळ येणार नाही.असे मत तहसिलदार मिलिंद वाघ यांनी व्यक्त केले.यावेळी
लग्न समारंभात दोन्ही वधू-वर पक्षतील नातेवाईक मुलीचे आई, वडील, भाऊ, काका, काकू, मुलाचे आई, वडील, काका, काकू, पत्रकार वसंतराव पाटील,पत्रकार-प्रा.हिरालाल पाटील, पत्रकार-गजानन पाटील तसेच मित्रपरिवार आदी उपस्थित होते.
*गजानन पाटील,अमळनेर*✍
