यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत.
अमिता कदम (पुणे प्रतिनिधी)
पुणे .ता.१२ जून
करोनोग्रस्त आणि आपदग्रस्तासाठी वाढत्या खर्चाला मदत व्हावी आणि सामाजिक भान ठेवून आज साधना हौसिंग सोसायटीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा चेक देण्यात आला.
दरम्यान या प्रसंगी साधना हौसिंग सोसायटीचे मा.सेक्रेटरी तथा महाराष्ट्र .राज्य सह निवडणूक प्राधिकरण यांचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. वाय.जी.पवार तसेच ऊँ जय शंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सु.द.उर्फ पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य श्री. अनिल कवडे साहेब(IAS) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
त्यावेळी स्वामीकन्या आणि समाजसेविका सौ.जयश्री पवार उपस्थित होता.
श्री.वाय.जी .पवार आणि त्यांना सतत सावलीसारख्या साथ देण्याऱ्या त्याच्या पत्नी सौ.जयश्री पवार यांनी समाजकार्याच्या माध्यमातून नेहमी गरजूंना मदत केली आहे. आणि साधना हौसिंग सोसायटी नेहमी संकटकाळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न या सोसायटीच्या मार्फत नेहमी होतो.
अशा या समाजप्रिय आणि सामाजिक भान असलेल्या साधना हौसिंग सोसायटीच्या सर्व सदस्यांचे कौतुक आहे.
