Halloween party ideas 2015

*माणुसकी समूहा तर्फे वाढदिवसानिमित्त १०१ झाडांचे वृक्षारोपण*

*सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम*

लोहारा ता पाचोरा प्रतीनीधि -

माणुसकी ग्रुप लोहारा यांच्यातर्फे आज माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री गजानन भाऊ क्षीरसागर याच्या वतीने कल्यानरावजी दळे साहेब OBC नेते व गजानन क्षिरसागर त्यांच्या सौभाग्यवती सौ रुपाली ताई क्षीरसागर यांचा वाढदिवस निमित्ताने १०१ झाडे लावून साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या माणुसकी समुहाने यावेळेसही वेगळी वाट निवडली आहे. कल्पक वृत्ती आणि समाजभान याचा सुंदर सुवर्ण मेळ साधत माणुसकी समुहाने शहीद जवानांना श्रध्दांजली देत अखंड भारतमातेच्या जयघोषात
माणुसकी समुहाच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम प्रभावी पणे राबवला आहे. "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे... वनचरे |" ह्या म्हणीप्रमाने समाजातील लोकांना वृक्षलागवड आणि संगोपणासाठी प्रवृत्त करून निसर्गाचा समतोल राखल्या जावा याकरीता छोटासा प्रयत्न म्हणून वृक्षांची जास्तीत जास्त लागवड होणे गरजेचे आहे.यामगची संकल्पना हिच आहे की जास्तीत जास्त लोकांनी याकडे प्रभावीपणे लक्ष द्यावे कारण प्रश्न माणवी अस्तित्वाचा आहे. सोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने, वाढदिवस एक वृक्ष दोन व झाडे जगवा हा उपक्रम कार्यान्वित आहेच. आगळ्यावेगळ्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा व कार्याचे कौतुक केले.ही झाडे जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा ,श्रीराम मंदिर,लोहारा या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मालती ताई पाटील उपसरपंच कैलास आप्पा चौधरी संजय पाटील राजू भदाणे प्रल्हाद चौधरी डॉक्टर केयुर चौधरी व शालेय व्यवस्थापन समिती व पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळेस समाजसेवक सुमित पंडित,गजानन क्षीरसागर,रहिम भाऊ पटेल,विकास माळी, मुरलीधर जाधव,चंद्रकांत गीते,शशिकांत गीते,गोपाल वाणी,कवी मंगलदास मोरे,
श्यामभाऊ पालीवाल,सुधीर पाटील सर,रुपाली क्षीरसागर आदी माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.-
---------------------------------
महाराष्ट्रात १९७२ नंतरचा सर्वात भिषण दुष्काळ सध्या जानवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतिचा परिणाम आहे असे बोलले जात आहे.
वृक्ष आणि वन याच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगलसंपदा ही मानवी संपत्ती आहे तेंव्हा ‘वनश्री हीच धनश्री। वृक्ष लावू घरोघरी।।’ हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.
-----------------गजानन क्षीरसागर, माणुसकी समूह जळगाव जिल्हाध्यक्ष




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.