२००५ पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळावी यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आमदार अनिल पाटील निवेदन
२००५ पुर्वी शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळावी यासाठी शिक्षकांच्या पाठीशी
आमदार अनिल पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त पण टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन मिळावी यासाठी शिक्षण संघर्ष समितीच्या राज्याध्यक्षा संगीताबाई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यभर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी १० जुलै २०२० ची आधिसुचना तात्काळ रद्द करावी.राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त झालेल्या अनुदानित,,अंशता अनुदानित व तुकडयावर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना देण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे.व निवडणूक पुर्वी दिलेले शासनाने आश्वासन पुर्ण करावे.अशी मागणी करण्यात आली.आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.व आ.पाटील यांना पेंशनग्रस्त शिक्षकांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व सहकारी मंत्र्यांना जुनी पेंशनचा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले.लागलीच आ.पाटील यांनी लागलीच आ. पाटील यांनी समय सुचकता पाहून आमदार रोहीत पवार यांच्याशी शिक्षकांचे बोलणे करून दिले.२००५ पुर्वी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा प्रश्न आमचे सरकार निश्चित मार्गी लावेल. व आमदार पाटील यांच्याकडे सविस्तर माहिती पाठवा आम्ही अधिवेशनात तो प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी जुन्या पेंशन संदर्भात विषय समजून सांगितला.आ.पाटील यांनी आश्वासन दिले कि २००५ पुर्वी पेंशन मिळावी त्यासाठी मी प्रयत्न करून मी सर्व शिक्षकांच्या पाठीशी आहे असे सांगितले. शिक्षकांनी आ.पाटील यांचे आभार मानले.
यावेळी जुनी पेंशन संघर्ष समितीचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रभुदास पाटील,मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे हर्षल पाटील, योगेश पाटील, निवृत्ती पाटील, काझी सर,प्रविण पाटील,असोलोउद्दीन काझी , क्रिडा संघटनेचे मिलिंद पाटील,हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दिपक पवार, सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक व मुख्याध्यापक तूषार पाटील,मुख्याध्यापक लक्ष्मीकांत सैदाणे,शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष आर.जे पाटील, देवगांव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, सुधाकर पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील, शरद अहिरराव, शेख मोहम्मद रफीक,डि.आर.वाघ शिक्षक उपस्थित होते.

