बीड (प्रतिनिधी) ,मराठी साहित्य मंच ई -काव्य संग्रह जुन-२०२० मासिक अंक ऑनलाईन प्रकाशन सोहळा
सुप्रसिद्ध कवयित्री /लेखिका/तंत्रस्नेही शिक्षिका/ संपादिका व साहित्य क्षेत्रातील कोहिनूर
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
मुळ रहिवासी-धाराशिव उस्मानाबाद
मु.पो.कोकलगाव(कर्मभुमी)
ता.जि.वाशिम
यांच्या शुभहस्ते ११ जुन २०२० रोजी ११ :११ वाजता अगदी थाटात व उत्साहात संपन्न झाला ,या वेळी नक्षत्राधीस कवी वादळकार राजेंद्र सोनवणे हे ही समूहात उपस्थित होते
काव्य संग्रहाचे संपादक काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
मु.पो.चांदा,ता.नेवासा, जि. अहमदनगर-
(राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित)
यांनी या सोहळ्यास मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले
तसेच प्रशासक समितीचे नंदकुमार शेंदरे सर,सौ. शालू विनोद कृपाले मॅडम,विशाल पाटील वेरुळकर यांनी ही विशेष सहकार्य केले
या अंकात अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक व नवं लेखकांच्या
कवीता प्रकाशित झाल्या
मुख्य संपादक श्री अंगदजी दराडे आणि प्रा. रावसाहेबजी राशिनकर (साहेब) , तसेच प्रशासक समिती आणि संपूर्ण टीम यांनी सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा ई- काव्य संग्रह तयार केला
यातील सर्व कवीता अगदी आकर्षक,वाचनीय आणि सर्वच विषयांना न्याय देणारा आहे.मुखपृष्ठ तर अगदीच बोलके आहे.या अंकांतील राशिनकर साहेब , मुख्य संपादक अंगद दराडे आणि मिनाक्षीताई यांच्या मनोगताची शब्दगुंफन वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे.काव्यसंग्रह प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच आहे.या काव्यसंग्रहामध्ये आई,पावसाचे रूप,वृक्षतोड, मन,पुन्हा ते दिवस येतील,आमची गरिबी, मुखवटे,शेवटची इच्छा,ढवळ्या पवळ्या, त्याग,माणुसकी ,माझं गाव ,माहेर या आणि अशा इतर एकूण 62 कवितांचा समावेश आहे.
.या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून नवकवी आणि कवयित्रींच्या लेखणीला वाव आणि लेखनाची संधी नक्कीच मिळाली आहे.
या मध्ये युवा कीर्तनकार गणपत माखने महाराज , प्रा.डॉ.संतोष तागड , गजानन दराडे , मयूर बागूल , जयश्री बापट , भारती सावंत , भाग्यश्री पटारे , हर्षदा वाकचौरे , दिलीप धायगुडे, विक्रांत शेवारे , बाल कवी अनोमा मालसमीदर , अंजु येवले , उषा ढेरे- करपे,पुजा बागुल,श्रद्धा कुलकर्णी, निशा खापरे,योगिता शिरोरे,कल्पना म्हापुसकर,शोभा वागळे, सुचित्रा कुंचमवार यांसह नामवंत कवी-कवयित्रींच्या रचनाचा समावेश आहे
काव्य संग्रह सोहळा संपन्न होताच अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांचे लेखी अभिप्राय समूहात पाठवले
व काव्यसंग्रहाचे संपादक रावसाहेब राशिनकर व अंगद दराडे यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले
