Halloween party ideas 2015

*कल्पनेश्वर प्रतिष्ठान व राजू फाफोरेकर मंडळातर्फे कारगिल विजय दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न*

*आमदार अनिल भाईदास पाटील व माजी सैनिकांची उपस्थिती.*

अमळनेर(प्रतिनिधी)
२६ जुलै १९९९ रोजी भारताने कारगिल वर विजय मिळवला होता,यात भारतीय सैनिकांच योगदान,त्यांचं शौर्य अफाट होत. म्हणूनच हा दिवस भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.याच दिवसाच औचित्य साधून ढेकू रोड, पिंपळे रोड भागात माजी सैनिक व आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत कल्पनेश्वर प्रतिष्ठाण व माजी नगरसेवक राजू फाफोरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले होते.
या वेळी आमदारांच्या हस्ते उपस्थित माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला माजी सैनिक अशोक साळुंखे, राजेंद्र पाटील,भूषण पाटील,धनराज पाटील,घनश्याम काटे,राहुल शिंपी,किरण देसले,जगदीश पाटील ,हर्षल पाटील,पंकज पाटील,राकेश पांडव,अजय देशमुख,जितेंद्र सोनवणे,ऑन ड्युटी सुहास बडगुजर
यातील काही माजी सैनिकांनी कोरोनाच्या काळात देखील उल्लेखनीय काम केले आहे.
ढेकू रोड, पिंपळे रोड भागात वृक्षारोपण झाल्यानंतर रोपांना संरक्षक जाळी देखील लावण्यात आल्या.या रोपांची पुढील जबाबदारी कल्पनेश्वर प्रतिष्ठानने घेतली आहे.
सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजू फाफोरेकर,अशोक पवार,सुरेश पाटील संदीप घोरपडे,यज्ञेश्वर पाटील, हितेश पवार,तुषार पवार, जितेश कदम,पंकज भदाने,अनिरुध्द ठाकरे,हरीश वाणी,राकेश पाटील,निलेश पाटील,आर.जे.पाटील,राहुल पाटील,शरद पवार,पवन लोहार, अभिषेक ढमाळ,भुषण पाटील,अशोक पाटील,जे.एस पाटिल,अनिल वाघ,मंगेश शिंपी,दिनेश पाटील,शंभू पंजे,विलास दोरकर,मुक्तार खाटीक,भागवत गरूजी तसेच ढेकू रोड,पिंपळे रोड भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व नागरिकांनी कल्पनेश्वर प्रतिष्ठानच्या पर्यावरण पुरक कार्याचे कौतुक केले.
फोटो







WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.