Halloween party ideas 2015


माजी आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोनाच्या पाश्वभूमीवर गरजूंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करा


अमळनेर प्रतिनिधी
आज माजी आमदार साथी गुलाबराव पाटिल यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा,हार, पुष्पगुच्छ,भेटवस्तू देण्याऐवजी कोरोनाच्या या विपदेत आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्याच परिसरातील गरजू गरीब कुटुंबाना जीवनावश्यक किराणा देऊन मदत करा व दूरध्वनी ने शुभेच्छा द्या! असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव यांचेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.
अमळनेर परिसरात आजही खान्देशची मुलूख मैदान तोफ म्हणून सुपरिचित असलेले मा.आ.गुलाबराव पाटिल यांचेवर प्रेम करणारे अनेक चाहते दरवर्षी जन्मदिवसाच्या निमित्ताने बापुंना भेटवस्तू व पुष्पहार, गुच्छ देण्यासाठी घरी येतात.अश्या सर्व चाहत्यांनी यावेळी कोरोना साथीत ज्या गरीब कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे.लॉक डाऊन मुळे ज्यांचा रोजगार गेलेला आहे अश्या दुर्बल परिस्थितीत असणाऱ्या गरीब गरजूंसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते कोणतीही जाहिरात न करता ६५० /- चे जीवनावश्यक किराणा किट घरपोच उपलब्ध करून देत आहेत अश्या कार्यकर्त्यांना सदरचे किट वाटपासाठी घेऊन दिले तरी मा.आ.गुलाबराव पाटिल यांना शुभेच्छा मिळाल्यासारखे आहे.ज्यांना अशी सेवाभावी मदत करायची आहे त्यांनी साने गुरुजी विद्या मंदिर येथे सदरचेशुभेच्छा रुपी किराणा साहित्य आणून दिल्यास स्वीकारले जाईल असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटिल,सचिव संदिप घोरपडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.या सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी संबंधित सक्रिय कार्यकर्ते संदिप घोरपडे, प्रा.अशोक पवार, भास्कर बोरसे, रणजित शिंदे, बन्सीलाल भागवत,प्रशांत निकम,चेतन शहा,शुभम निकम यांच्याकडेही वस्तू किंवा रोख स्वरूपात जमा केल्यास गरुजू कुटुंबीयांपर्यंत किराणा किट पोहोचविला जाईल असे जाहिर आवाहन करण्यात आलेले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.