Halloween party ideas 2015


धुळे प्रतीनिधी

रा.उ.शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या वतीने हरण्यामाळशिवार येथे मोठी कारवाई....

✍️आज दि.2/6/2020रोजी रा.उ.शुल्क विभागाच्या धुळे जिल्हा भरारी पथकाच्या वतीने धडक कारवाईत धुळे तालुक्यातील हरण्यामाळशिवार(दरीत) बाभळींच्या वनात अवैध गावठी दारू भटट्या मोठ्या प्रमाणात उध्दवस्त करण्यात आल्या.
सदर कारवाईत दु.निरीक्षक श्री.बी.आर.नवले,दु.निरीक्षक श्री.एस आर नजन,श्री.ऐ.व्ही.भडागे,श्री.के.एम.गोसावी,श्री.डी.टी.पावरा,हे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते....
या कारवाईत सुमारे 1020लीटर रसायन, मुद्देमाल मिळून 24000रू किमंतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला....
गेल्या आठवड्यात रा.उ.शुल्क विभागाच्या वतीने अवैध गावठी दारू विरोधात धुळे जिल्ह्यात धडक कारवाई सुरू असून एकाच आठवड्यात आनंदखेडे, कुसुंबा,न्याहळोद, हरण्यामाळशिवार येथे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आल्या आहेत....
धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र दारू बंदी महीला युवा मोर्चा च्या वतीने सौ गीतांजली कोळी यांनी यासाठी रा.उ.शुल्क विभागाच्या कामगिरी चे कौतुक केले असून विभागाने वेळोवेळी अशा धडक कारवाई करून खेडोपाडी च्या दारू बंदी साठी संघर्ष करणाऱ्या महिलांना दिलासा द्यावा अशी विनंती केली आहे....

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.