*अमळनेर शहरातील शिवशक्ती चौकात कोरोना रूग्ण सापडूनही प्रशासनाकडून अर्सेनिक अल्बम 30 गोळयांचे वाटप नसल्याने नागरिकांचा संताप, स्थानिक नगरसेवीका कल्पना चौधरी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पकंज चौधरी यांनी स्वखर्चाने वाटल्या गोळ्या*
अमळनेर- येथील शिवशक्ती चौक भागात 27 तारखे पासून कोरोना रुग्ण सापडून देखील कुठलीही विशेष खबरदारी न घेतल्याने नागरिकांचा मध्ये संतापाचे व भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने शासनाकडून उपलब्ध अर्सनीक अल्बम 30 गोळ्या देखील वाटण्याची तसदी घेतली नाही .त्यामुळे आज शेवटी प्रभागाचा नगरसेविका सौ. कल्पना चौधरी यांच्या मार्गदर्शनाने मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकजभाऊ चौधरी यांनी स्वखर्चाने आज परिसरात अर्सनीक अल्बम 30 चा गोळ्या वाटपाला सुरुवात केली संपूर्ण परिसरात येत्या दोन दिवसात वाटप करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच ज्या प्रभागात/परिसरात रुग्ण अजून पर्यंत आढळले नाही तिथे तहसिलदार सोयी पुरवण्याबाबत फोटो टाकून प्रसिद्धी मिळवत आहे व जिथे रुग्ण आढळत आहेत तिथे ढुंकून ही पाहायला तयार नाहीत. तसेच शिवशक्ती चौक मागील भाग (कोष्टी वाडा) परिसरात तर जिथे रुग्ण आढळला आहे तिथे प्रशासनाने फक्त घराचे फोटो काढून नेले त्या भागाला ना सील केलं ना फवारणी केली यातून प्रशासन किती गंभीर आहे हे दिसत असल्याचे मत पंकज चौधरी यांनी व्यक्त केले आहे. सुरू असलेल्या ढिसाळ कारभार विषयी नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना या बाबत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मा.आमदार शिरिषदादा चौधरी यांनी स्वखर्चाने 2 वेळेस निर्जंतुकीकरण फवारणी केल्याने शिरिषदादा चौधरींचे आभार मानले आहेत. परिसरात तज्ञ होमियोपॅथिक डॉक्टराचा मार्गदर्शाने स्वयंसेवकां सह सदर गोळ्या वाटप करण्यात आल्याने नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.
