Halloween party ideas 2015

मजुर आणि वाहतूक करणाऱ्या धंदा वाल्यांची उपासमारीची वेळ?यांचा कोण वाली?
मालवाहतूक करणाऱ्या,व रिक्षा चालवून जेमतेम संसार भागविण्यासाठी जिवनव्यथिल करणारे झाले.. धोबी का कुत्ता ना घरका,ना घाट का. अशी वेळ आली आहे.कारण ते व त्यांचे परिवाराला भिक मागता येत नाही किंवा त्यांना कोणी मदत करत नाही.शासनाला तरी ते दिसत नाही.काही दानशूर किलो भर वाटतात.फोटो प्रसिध्दी टन भर करतात.
मला आठवतंय की म्हण आहे.. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला समजु नये.यालाच स्वेच्छा दान म्हणतात.आता तर नकोतो.बिल्लासभर फडक्याचा माक्स खंडीभर रिकामे टेकडे गोळा करून मिडयावर डझन भर प्रसिध्दी करतो. फारच लाजिरवाणी गोष्ट आहे.
अन्नदान श्रेष्ठ दान संकटात समजले जाते.परंतु देणारा जर अनेकांना सोबत आणुन देवतांना घेणार घेतांना फोटो सहीत प्रसिध्दी करिता असेल तर तो गरजुच्या परिस्थिती चा अपमान आहे.म्हणुन स्वेच्छा दान करा.प्रसिध्दीदान करू नका कारण परिस्थिती गंभीर आहे तुमच्या कडे मदती साठी ऐपत असेल तर जरूर द्या.हातावर पोट भरण्यासाठी वाट पहाणार्यांना त्याची खरोखरच गरज आहे.हिच वेळ आहे पुण्य कमविण्याची.पैसे तर आयुष्यभर कमवता येतील.
निस्वार्थ दान करा.मनपासुन आशिर्वाद मीळवा.ऋणी हे ऋण वेळी नक्कीच जाणीव करून फेडकेल्याशिवाय राहाणार नाही.
दाते हो गाणं आठवा..
गरिबोकी सुनो वो तुम्हारी सुनेगा.तुम एक पैसा दोघे वो दस लाख देगा.
अंधारात चाचपडत पाकीट घेणार नाही.उजेडात न लाजवता सढळ हाताने मदत करा.
धन्यवाद🙏🤝🏻🤝🏻👍💐🔏
जगन्नाथ बडगुजर जेष्ठ पत्रकार ९८९०२६०८८७

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.