अमळनेर प्रतिनिधी
आज रोजी देि-२४.०४.२०२० लोण खुर्द गावात कोरोना व्हायरस ( कोविड - १९ ) च्या अनुषंगाने प्रा. आ. केंद्र - मांडळ येथून डॉ. सागर पाटील ( वैद्यकीय अधिकारी ), श्रीमती घुगे मॅडम, श्री.चौधरी साहेब, श्रीमती वैशाली ठाकरे यांनी लोण खुर्द ग्रामपंचायतिला भेट देऊन ग्रामस्तरिय कोरोना जन जागृती समितीचे कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बाहेर गावाहून आलेल्या ७६ लोकांपैकी ५० जण हे १४ दिवस पुर्ण झालेले आहेत त्यांना कुठलेही कोरोना विषयिक लक्षणे आढळले नाहीत. ऊस तोड मजूर बाहेगावाहून आलेले असुन त्यांना होम कोरंटाईनचा शिक्का मारून त्यांच्या राहत्या घरात होम कोरंटाईन करण्यात आलेले आहेत तसेच गावांतील लोकांना घरातुन बाहेर न पडण्याचे व गावांतील नागरिकांनी गावात कुठेही काम नसतांना फिरू नये किंवा बाहेर गर्दी करून बसु नये तसेच परस्परांतील योग्य ते अंतर ठेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.संगीता अशोक पाटील, उप-सरपंच सौ.सुमनबाई शिवाजी भिल. ग्रामसेवक योगिता वसंतराव पाटील आशा स्वयंसेविका सौ.आश्विनी भिल ग्रा.प.कर्मचारी श्री. अशोक साहेबराव पाटील. श्री गंगाराम तात्या पो. पाटील उदय निंबा पाटील, अंगणवाडी सेविका सौ. जनाबाई लोटण पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.भगवान आबा, श्री. निरंक पाटील उपस्थित होते
