खबरदार .....वैद्यकीय सेवा वगळता ग्रामीण भागात इतर दुकाने सुरू राहीली तर ५००० रुपये दंड भरावा लागेल.
गटविकास अधिकारी
संदीप वायाळ
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात तीन दिवस संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने कुणीही घराबाहेर पडू नये. वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा,दुकाने बंद राहतील. यादरम्यान कुणीही दुकानं सुरू ठेवल्यास 5000रूपये दंड आकारण्यात येईल.तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या या गावठी दारू विक्रीसाठी वापरल्या जात आहेत. कुणीही प्लॅस्टीकची विक्री करताना किंवा प्लॅस्टिक वापरताना आढळल्यास दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.आजपासून अंमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात 100%प्लॅस्टीक बंदी राहील यांची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.संदीप वायाळ गटविकास अधिकारी पंचायत समिती अंमळनेर यांनी माहिती दिली.