सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळाकडून नियुक्तीपासून वंचित..
चार महीन्यापासून प्रस्ताव प्रलंबित
पाचोरा येथील बहुळा धरणावरील कार्यरत सुरक्षा रक्षक यांना जळगाव सुरक्षा रक्षक मंडळाकडून नियुक्ती मिळावी यासाठी गेल्या चार महिन्यांपासून सहाय्यक कामगार आयुक्त जळगाव येथे प्रस्ताव प्रलंबित आहे. जळगाव पाटबंधारे विभाग यांनी सप्टेंबर महिन्यात मंडळाकडे सुरक्षा रक्षक मागणीसाठी पत्र पाठवले होते. मात्र सुरक्षा रक्षक नियुक्त करताना मुख्य मालक महणुन शाखा अभियंता याचे शिफारस अवश्यक असते मात्र गेल्या चार महिन्यांपासून अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत प्रसंगी सुरक्षा रक्षक नेमणुक गेल्या चार महिन्यांपासून अधिकारी यांचा बेजबाबदार पणा सपष्ट दिसुन येतआहे. वेळोवेळी सुरक्षा रक्षक मंडळाकडून निरिक्षक यांनी सबंधीत अधिकारी यांचाकडे चकरा मारून सुधा पाटबंधारे विभागातील कामचोर,निर्लज्य, स्वाभिमानशुनय अधिकारी यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ऐक मे कामगार दिना पर्यंत योग्य कारवाई करावी अन्यथा अखिल स्वराज सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन रजि मुंबई पदाधिकारी कोणतीही पुर्व सूचना न देता सबंधीत अधिकारी यांना घेराव घालिल याची नोंद घ्यावी असे सोमा कढरे यांनी कळविले आहे.