अमळनेरात आणखी पाच कोरोना बाधित आढळले
तालुका हादरला,
नागरिकांच्या बेशिस्त वागणूकीचा परिणाम
कोरोनाग्रस्त दाम्पत्यांचे कुटुंबच बाधित
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सध्या अमळनेर तालुक्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासन,प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी सुचना देऊनही नियमांचे पालन न केल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांनी वेळीच सावधानता बाळगली नाही तर येणारा काळ तमाम अमळनेर करांसाठी धोक्याचा आहे असे म्हणने चुकीचे होणार नाही.
सध्या अमळनेर तालुक्यात नागरिकांचे सहकार्य प्रशासनाला मिळणे अपेक्षित आहे. अमळनेरात काही भागात परिस्थिती गंभीर झाल्याने तिन भागात हाय अलर्ट करण्यात आले आहेत.अमलेश्वर नगर, साळीवाडा,शाहआलम नगर सिल करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्यातील ३१ कोरोना संशयित व्यक्तीपैकी ३ रूग्ण पाँझिटिव्ह आले होते.त्यापैकी एक महीला मृत झाली व तिच्या संपर्कात नातेवाईक मंडळीला ५ जन पाँझिटिव्ह आहेत. असे एकूण शहरातील बाधीतांची संख्या ८ झाली व तालुक्यातील मुंगसे येथील १ असे कोरोना पाँझिटिव्ह संख्या ९ झाली आहे.
साळीवाडयात त्या महीलेच्या अंत्यविधीसाठी २० ते २५ जन होते व त्यांच्या नातेवाईक संबधातील पाच कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या १० जनांना जळगाव येथे तपासणी करण्यासाठी पाठवले आहे.
येथील कोविड रुग्णालयातून कोरोना संशयित म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या व्यक्तींपैकी पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. हे सर्व अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहे.
या पाचही व्यक्ती यापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या अमळनेर येथील मृत महिलेच्या कुटूंबातील आहे. यामध्ये 4 पुरुष व एक महिलेचा समावेश असून हे सर्व पुरुष 27 व 28 वर्षीय तर महिला 36 वर्षीय आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
अमळनेर येथील डॉ प्रकाश ताळे,डॉ गोसावी, डॉ महाजन कोरोना बाबत नागरिकांना आरोग्याबाबत जनजागृती करून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सांगत आहेत.अमळनेर पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,व कर्मचारी, उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी ,लोकप्रतिनिधी आपल्या स्तरावर नागरिकामध्ये जनजागृती करीत आहे.
चौकट
अमळनेरच्या मृत बाधित महिलेशी संपर्क आलेल्या ५ जणांस ह ३२ नमुने निगेटीव्ह
जळगाव :येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल *निगेटिव्ह* आले आहेत.
यामध्ये अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली.