Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
नामदार ,श्री भाऊसो गुलाबरावजी पाटील पालकमंत्री, जळगांव जिल्हा
यांसी सविनय सादर,जय महाराष्ट्र
विषय - पिण्याच्या पाण्यासाठी बोरी मध्यम प्रकल्प (तामसवाडी) धरणांतून आवर्तन सोडणे बाबत
महोदय, आम्ही खालील अमळनेर तालुका शिवसेना पदाधिकारी आपणांस ह्या निवेदनाद्वारे विनंती करतो की सद्या उन्हाळा कडक जाणवत असल्याने अमळनेर तालुक्यातील बोरी नदी काठावरील गावाच्या विहरींची पातळी कमी झाल्याने लोकांना पिण्याचे पाणी व जनावरांनाही पिण्याचे पाण्याची अतिशय कमतरता भासत आहे त्यामुळे पारोळा तालुक्यांतील तामसवाडी येथील बोरी मध्यम प्रकल्पातून(धरणांतून) आवर्तन सोडून ते पाणी फापोरे, हिंगोणे गावापर्यंत पोहचू शकेल व त्यामुळे सद्याच्या कोरोना लॉकडाऊन परिस्थितीत निदान पिण्याचे पाणी लॉकडाऊनचे सर्व समांतर अंतर नियम पाळून जनतेला मिळू शकेल, तरी बोरी नदीत संबंधिताना आवर्तन सोडणे बाबत तातडीचे आदेश व्हावेत ही नम्र विनंती , जय महाराष्ट्र
- आपले शिवसेना सेवेत-
डॉ राजेंद्र पिंगळे उपजिल्हाप्रमुख अमळनेर
विजय पाटील तालुका प्रमुख अमळनेर
संजय पाटील शहर प्रमुख
राजू फापोरेकर माजी नगरसेवक
सौ मनिषा परब महिला आघाडी उपजिल्हा संघटिका
शिवकुमार पाटील उपतालुका प्रमुख
चंद्रशेखर पाटील उपतालुकाप्रमुख
प्रताप शिंपी माजी शहरप्रमुख
नितीन निळे माजी शहरप्रमुख
महेश देशमुख संचालक कृ उ बा समिती
जितेंद्र झाबक व्यापारी सेना प्रमुख
देवेन्द्र देशमुख माजी उप जि
शिवसेना अमळनेर तालुका पदाधिकारी यांच्या पत्रकावर सहया होत्या.

चौकट
शिवसेना अमळनेर पदाधिकारी वतीने पालकमंत्री यांना निवेदांदेऊन व मोबाईलवर समक्ष बोलून तातडीने बोरी नदीत आवर्तन सोडणे बाबत विनंती करण्यात आली आहे
डॉ राजेंद्र पिंगळे उपजिल्हाप्रमुख..

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.