शाळा बंद....पण शिक्षण आहे!!
कोविड-19 च्या प्रादुर्भाव पहाता 16 मार्च पासून शाळा ह्या बंद झाल्या,लोकडाऊन वाढत आहे हे पहाता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ऑनलाइन अभ्यासमाला हा उपक्रम सम्पूर्ण राज्यात सुरू झाला.
सुधागड तालुक्यात मा.गटशिक्षणाधिकारी श्रीम.शिल्पा दास मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक केंद्रातील व्हाट्स अँप च्या माध्यमातून माहिती देण्यात आली,तसेच गट साधन केंद्र विषय साहाय्यक यांच्या माध्यमातून प्रत्यक शाळेचं पालकांचं व्हाट्सएप ग्रुप तयार करण्यात आला,त्यातून ONLINE STUDY NENVALI हा पालक ग्रुप तयार करण्यात आला ह्या गटात विषय सह्ययक श्रीम.खैरे मॅडम व केंद्रप्रमुक श्री.रमेश रोहेकर ह्यांच्या मार्गदर्शनाने हा ऑनलाइन स्टडी ग्रुप कार्यन्वित झाला,ह्या गटात एकूण 12 पालकांच्या अँड्रॉइड मोबाइल माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासमाला दररोज पाठविण्यात येते
दि.१६ एप्रिल पासून ही ऑनलाईन अभ्यासमाला सुरू झाली,यामध्ये इयत्ता १ ली ते १० वि चा दररोज एक विषय घेऊन व्हिडिओ द्वारे लिंक दिल्या आहेत,विद्यार्थी आपल्या इयत्तेनुसार सदर लिंक पाहून त्यातील मुद्दे,प्रश्न वहिवर दररोज सोडवतात,दर रविवारी झालेल्या व पाहिलेल्या घटकावर प्रश्नमंजुषा येते त्यातून विद्यार्थी सराव करतात,ह्यसाठी पालकांनी दीक्षा अँप च्या माध्यमातून ही ऑनलाईन अभ्यासमाला सोडवण्यासाठी नेणवली शाळेतील पालक व विद्यार्थी दररोज ऑनलाईन अभ्यासाचा लाभ घेत आहे,म्हणजेच शाळा बंद....पण शिक्षण आहे... हा उपक्रम विद्यार्थ्यांना सुट्टीत निश्चितच लाभदायक ठरतोय.
विविध लिंक द्वारे मराठी,गणित,इंग्रजी,सामान्य ज्ञान,तसेच वैज्ञानिक गोष्टी व्हिडिओ हा अभ्यास आम्हला सुट्टीत करायला नवीनच व मस्त वाटला
मनस्वी कोंडे,६वी,
नेणवली शाळेचे शिक्षक श्री.अंबिके सरांनी ऑनलाइन कलासद्वारे सुरू केलेला अभ्यास आमची मुले आवडीने करतात,घरी राहून देखील शाळा आहे हे खरे!
श्रीम. अनुष्का चव्हाण,पालक,नेणवली
नेणवली च्या पालक व विद्यार्थ्यांनी ह्या ऑनलाइन अभ्यासमलेस दिलेला प्रतिसाद मला पुढील नवनवीन शिक्षणात तंत्रज्ञान वापरास व प्रयोग करण्यास प्रोत्साहित करतात हे स्वागतार्ह!
श्री.राजेंद्र अंबिके,उपशिक्षक,नेणवली
