Halloween party ideas 2015


मारवड येथील प्रफुल्ल पाटील यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत, वाटले गोरगरिबांना तेलाचे पाऊच...

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सध्या देशात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. शासन व प्रशासन त्याचा युद्धपातळीवर सामना करीत लढत आहे. अशातच लाँकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने  अशावेळी सामाजिक, धार्मिक संस्था पुढे येऊन गरजूंना मदतीसाठी एक हात पुढे करीत सढळ हाताने सहकार्य करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील मारवड या ग्रामीण भागातील युवा तरूण प्रफुल्ल पाटील याने आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत मारवड येथे गरजूंना तेलाचे पिशव्या वाटून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कामाचे परीसरात अभिनंदन होत आहे.

       आपण पाहत आहोत संपूर्ण जगात कोरोना नें कीती थैमान घातले आहें --------
       म्हणून सर्व सन उत्सव संपूर्ण  पणे बंद ठेवन्यात आलें आहे .की कुठेही गर्दी होऊ नये म्हणून काल यानिमित्ताने आमचे मित्र  प्रफ्फूल पाटिल याने त्याचा वाढदिवस अत्यंत साधा पध्दतीत साजरी केला ------
     व वाढदिवसाच्या सेलिब्रेशन / पार्टी वगैरे न करता त्या पैशांनें आमच्या मारवड पलाट मध्ये प्रफुल्ल पाटील यांच्या वाढदिवस निमित्त अत्यंत सर्व सामान्य लोकांना ज्यांचे या लॉकडाऊन मुळे काम धंदे व्यवसाय बंद आहेत अश्या लोकांना स्व खर्चाने 1 किलो तेल चे पाऊच वाटले .जवळजवळ 3 हजार रुपयाचे  तेलाचे पाऊच वाटून समाजात एक नविन आदर्श निर्माण केला .....
    भविष्यात ही तरुण मुलांनी प्रफुल्ल पाटील याचा आदर्श घ्यावा ..वाढदिवस न सेलिब्रेशन पार्टी वगैरे न करता फालतू खर्च होणारा पैसा चांगल्या कामात लावावा. आज खरोखर कौतुक करावे तेवढे कमी आहे असे युवा कार्यकर्ता समाधान पाटील याने आपल्या भावना  मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.