Halloween party ideas 2015


*खानदेशातील अवलिया चित्रकार मनोहर बाविस्कर*

भातखंडे✒️ (प्रतिनिधी) खान्देशच्या मातीतले अनेक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कलागुण नेहमीच उमटवण्याचा प्रयत्न करत असतात करत आहेत. असाच एक अवधिया कलाकार चाळीसगाव तालुका पिलखोड येथील रहिवासी मनोहर बाविस्कर सर तर त्यांचे सासरे तळई तालुका एरंडोल येथील  श्रावण शहादु महाजन
 गुरुजी हे असून ते मुंबई येथील प्रगती विद्यालय बोरिवली पश्चिम याठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून कलाशिक्षक म्हणून सेवेत आहे त्यांनी त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून अनेक कला अविष्कार सादर केलेले आहेत अलिकडेच त्यांनी लॉक डाउनच्या कालखंडामध्ये कोरोणा विषाणूच्या महामारीवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीतून गणरायाला साकडे घातले या कला शिक्षकांनी दहा तासात १०८० चित्रे पूर्णपणे रेखाटन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड त्यांच्या कलाकृतीची अमेझिंग बुक ऑफ रेकॉर्ड यांनी त्यांच्या कलेची विशेष दखल घेतली असेच एक पेन्सिल वर्क त्यांच्या कलेतून त्यांनी अलीकडेच सादर केली ती महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे जळगांव जिल्हाध्यक्ष बी एन पाटील तथा पत्रकार यांचा फोटो वरून पेन्सिल वर्क त्यांनी अतिशय हुबेहूब तयार केले त्यांचीही अप्रतिम कलाकृती संपूर्ण खानदेशी वासियांना भूषणावह आहे. त्यांच्या कलेचा खानदेशातील तमाम कलारसिकांना नेहमीच सार्थ अभिमान वाटत असतो.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.