विक्रमी २६ लाख व्ह्यूज घेणारा एकमेव लोकाशाचा लेख
लोकाशा प्रतिनिधी
दैनिक लोकाशा कडून सलग तीन वर्षे पासून क्रॉसलाईन नावाचे सदर वेगळे विषय घेऊन शब्दबद्ध होत आले आहे , सामाजिक राजकीय असो वा मग वैज्ञानिक नैसर्गिक अध्यात्मिक , परखड लेखणीची साक्ष म्हणून दैनिक लोकाशाच्या पत्रकारितेने सामान्य मनाचा वेध आणि मान्यता मिळवली आहे . क्रॉसलाईन सदराने नेहमीच महाराष्ट्राच्या मनाला गवसणी घातली आहे . टीक टोकं वरून अनेकदा चुकीचा मसुदा व्हायरल होत असल्याचे निरक्षण मांडत यामुळे मुलींना नाहक त्रास होत असल्याचे समोर आणले होते . यावरून अनेकदा लैंगिक शेरेबाजी होत असल्याचे देखील दैनिक लोकाशाने क्रॉसलाईन मधून मांडले होते . २३ तारखेच्या मराठी लेखात हैलो ऐप सर्वाधिक वाचलेला लेख दैनिक लोकाशाचा क्रॉसलाईन होता . पुणे येथून सदरील कंपनीच्या प्रतिनिधी कडून तसे दैनिक लोकाशाकडे कळविण्यात आले .
६ हजार २०० लोकांनी सदरील क्रॉसलाईन व्हात्स ऐप वरून इतरांना पाठवण्यात आलेली आहे तर १२ हजार ६०० लोकांनी यावर आपली मोहर दिलेली आहे , ४६९ लोकांनी यावर आपला प्रतिक्रिया नोंदवली आहे . या लेखाला तब्बल २६ लाख लोकांनी व्ह्यूज दिलेले आहेत जो विक्रम ऐप वर क्रॉसलाईन च्या नावे झालेला आहे . दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांनी सर्व लोकाशा परिवाराचे या यशा बद्दल अभिनंदन केले.
