Halloween party ideas 2015


मका व ज्वारी शासकीय धान्य खरेदी सुरूच शेतकऱ्यांमध्ये गैरसमज व संभ्रम तयार करणाऱ्यांच्या नादी लागू नये - आमदार अनिल पाटील
प्रतिनिधी अमळनेर :
मका व ज्वारीचा शासकीय खरेदी सुरूच असून
शेतकऱ्यांमध्ये गैरसमज व संभ्रम तयार करणाऱ्यांच्या व ऐकीव माहिती पसरवणारे राजकीय कार्यकर्ते यांच्या नादी शेतकऱ्यांनी लागू नये असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
यापूर्वी 300 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने शेतकरी बोलावण्यात येऊन मोजमाप सुरू आहे मात्र शासकीय सुट्या वगळता व तांत्रिक अडचणी असतांना केंद्र बंद झाल्याच्या गैरसमज पसरवण्याचा उद्योग करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. मात्र अशी परिस्थिती नाही.
गेल्या सत्ता काळात खरेदी केंद्र कसे चालवले गेले ते आम्हांला माहिती आहे. त्यांनी किती बोंब पाडली त्यांनी शेतकऱ्यांना सांगून स्वतःच्या सत्तेत झालेले पितळ उघडे करू नये. खरेदी सुरूच राहील व नोंद झालेल्या शेतकऱ्यांचे धान्य रीतसर मोजले जाईल त्यांनी चिंता करू नये आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहे.
शुक्रवारी केंद्र सुरू झाले दुसऱ्या दिवशी शनिवार व रविवार शासकीय सुट्या असल्याने केंद्र बंद होते सोमवारी पुन्हा सुरू झाले असून आतापर्यंत 700 क्विंटल मका व ज्वारी खरेदी झाली आहे.दररोज 10 शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना नंबरने एसएमएस फोन करून मोजमाप करण्यासाठी आधीच्या दिवशी कळवले जाते.
दरम्यान शासनाकडे बारदान नसल्याने देखील खरेदी करण्यास अडचण होती अखेर तहसीलदार मिलिंद वाघ यांनी 2 हजार बारदान उपलब्ध करून दिले असून वरून अजून बारदान उपलब्ध करण्यासाठी पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जाईल याची काळजी विरोधकांनी करण्याची गरज नाही हे सरकार खरेदीसाठी सक्षम आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन संदेश देऊन बोलावण्यात येईल त्यानुसारच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे. मका हमीभाव 1760 आणि ज्वारी 2550 असे दर आहेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.