Halloween party ideas 2015

*अमळनेर तालुक्यातील कापूस खरेदी बुधवार पासून पारोळा येथे*

अमळनेर-तालुक्यातील कापूस खरेदी बुधवार पासून पारोळा येथे सुरु होणार असल्याची माहिती मा. आ.स्मिता वाघ,आ.अनिल भाईदास पाटील, बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे .


तालुक्यासाठी निर्धारित करण्यात आलेले लामा जिनर्स येथील आगी मुळे मोठे नुकसान झाले असल्यामुळे केंद्रावरिल कापूस खरेदी बंद करण्यात आली होती.त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.ह्या परिस्थितवर मार्ग काढण्यासाठी मा. आ.स्मिता वाघ ,आ.अनिल भाईदास पाटिल यांनी जिल्हा उपनिबंधक व कापूस फेडरेशन चे अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.कृषि उपन्न बाजार समिति अमळनेर येथे नोंदणी केलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी नोंदणी नुसार पारोळा येथील केंद्रावर करण्यात येणार आहे.


अमळनेर येथील कापूस खरेदी केंद्रावर पुढील व्यवस्था लवकरच करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे मा. आ.स्मिता वाघ,आ.अनिल भाईदास पाटिल,सभापती प्रफुल्ल पवार व बाजार समिति संचालक यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.