अमळनेर: प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे संचालक तथा उपप्राचार्य आणि विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. ओ. माळी यांना मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अजयजी भामरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव चे वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री योगेशजी मुंदडा, कार्योपाध्यक्ष सीए नीरजजी अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती राणे, नाशिक येथिल वस्तू व सेवाकर उपायुक्त श्री मधुकर पाटील आणि माजी विद्यार्थी, मित्र, आप्तेष्ट आणि सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने सेवापूर्ती शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला.
देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी तसेच जमावबंदी असतांना कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एकत्रित येऊन निरोप समारंभ साजरा करणे शक्य नव्हते म्हणून शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा माजी प्रतापियन डॉ. श्याम साळुंखे यांच्या संकल्पनेतून असा हा आगळा वेगळा ऑनलाईन निरोप समारंभाची संकल्पना पुढे आली आणि आज रोजी डॉ. माळी यांना सेवापूर्ती सोहळा ऑनलाईन निरोप समारंभ साजरा करून आनंददायी आणि आरोग्यवर्धक शुभेच्छा देण्यात आल्यायाप्रसंगी, प्राचार्य डॉ. अजयजी भामरे यांनी तीस वर्षांपूर्वीच्या आठवणीना उजाळा दिला तर प्राचार्य डॉ. पी. पी. छाजेड यांनी विद्यापीठ परीक्षेत्रातील जुना सहकारी मित्र म्हणून आठवणी व्यक्त केल्यात यासह खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री योगेश मुंदडा यांनी आपल्या मनोगतात माळी सर आपण शासकीय नियमानुसार निवृत्त होत असले तरी महाविद्यालय आणि संस्था निवृत्त होऊ देणार नाही असे विशद केले कार्योपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल यांनी सरांना भावीआयुष्याच्या शुभेच्छासह सेवानिवृत्तीही जरी शासकीय नियमानुसार झालेली असली तरी आम्ही सरांना निवृत्त होऊ देणार नाहीत, सरांची आम्हाला व महाविद्यालयाला गरज असल्याचे नमूद केले तर प्राचार्या डॉ. राणे मॅडम यांनी सरांचे स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांना मिळालेली विविध क्षेत्रातील संधी त्यानिमित्ताने झालेले विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी,शिक्षण क्षेत्रात नेट सेट च्या माध्यमातून प्राध्यापक घडविलेत, तर प्रा. रा. का. पवार यांनी महाविद्यालयीन आणि कौटुंबिक आठवणींना उजाळा देत भावुक झालेत यासह पीएच डी मार्गदर्शक प्रा. डॉ. एन बी गोसावी, सीए अतुल शाह मुंबई, श्री. झांबरे, डॉ. धनंजय चौधरी, इ. आपली मनोगते व्यक्त केली आणि सुखी आणि आरोग्यदायी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात तर डॉ. माळी यांनी आपल्या जीवन कार्याचा, परिवाराचा, महाविद्यालय व्यवस्थापन, सहकारी प्राध्यापक, मित्र आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आपले भावनिक मनोगत व्यक्त केले आणि महाविद्यालय आणि व्यवस्थापन यांचे ऋणनिर्देश केलेत याप्रसंगी सुंदर असे स्वागत गीत श्रीमती जागृती माळी यांनी सादर केले, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन सूत्रसंचालन डॉ श्याम साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल माळी यांनी केले
