Halloween party ideas 2015


काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या सुपुत्राचा अमळनेरात झाला खरा आदर्श विवाह

केवळ 11 लोकांच्या उपस्थितीत वधूवरांनी बांधल्या रेशीमगाठी

अमळनेर-कोरोना लॉक डाऊन मुळे शासनाच्या निर्देशानुसार अनेक केवळ नावापुरता आदर्श विवाह होत असताना जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड संदीप पाटील यांनी आपल्या सुपुत्राचा केवळ 11 नातलगांच्या उपस्थितीत खरा आदर्श विवाह घडवून आणला.
अमळनेर तालुक्यातील रणाईचा येथील रहिवासी तथा एलआयसी चे विकास अधिकारी रवींद्र बाबुराव पाटील यांची कन्या चि.सौ का प्राची ही अमेरिका येथे एम एस आणि एमबीए होऊन तेथेच जॉब करीत आहे तिचा विवाह अँड संदीप सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस जळगाव व डॉ स्मिता संदीप पाटील यांचे सुपुत्र तथा डॉ सुरेश जि पाटील रा अमळगाव,ता अमळनेर ,हल्ली मुक्काम चोपडा आणि धुळे नानासाहेब झेड बी पाटील यांचा नातु चि.आदित्य यांचेशी निश्चित झाला होता,आदित्य हा बी टेक आणि एमबीए (आयआयएम) असून वधू आणि वर दोन्ही उच्चशिक्षित आहेत,दोन्ही कडील कुटुंबाची सामाजिक स्थिती पाहता हा विवाह अत्यंत थाटात होणे अपेक्षित होता परंतु कोरोना लॉक डाऊन मुळे शासनाने मोठ्या विवाह सोहळ्यावर निर्बंध आणून केवळ 50 नातलगांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी दिली आहे.परंतु अनेक ठिकाणी 50 लोकांच्या नावावर त्यापेक्षा जास्त गर्दी जमा करून नावाला आदर्श विवाह घडविले जात आहेत,परंतु जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांचेसह रणाईचे येथील रवींद्र पाटील यांनी आपल्या मुलांचा खरा आदर्श विवाह घडविण्याचा निश्चय करून दोन्ही कडील केवळ 11 नातलगांच्या उपस्थितीत अमळनेर येथे वधू च्या राहत्या घरी 25 जून रोजी खरा आदर्श विवाह घडवून आणला.या आदर्श विवाह सोहळ्याचे अनेकांनी कौतुक करत वधू वराना घरूनच शुभाशीर्वाद दिलेत.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.