*अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन*
अमळनेर-- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती अमळनेर बस स्टँड जवळील स्मारकावर सोशल डिस्टेंसिंग राखत साजरा करण्यात आली. यावेळी अमळनेर धनगर समाज अध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य डी.ए. धनगर, साने गुरुजी पीक संरक्षक सोसायटी चेअरमन दशरथ नाना लांडगे तसेच माजी उपनगराध्यक्ष चंदू परदेशी व सतिश धनगर हे उपस्थित होते.
