Halloween party ideas 2015


गरजपुर्ती "मन" काबुत ठेवा । "
शरीराचं मागणं असतं 'गरजपुर्ती' आणि माणसाचं मन मागतं 'इच्छापुर्ती'। शरीराला प्रमाणाबाहेर जास्त चालत नाही,गरजेपुरतंच चालतं.मनाला मात्र 'कमी नको' असतं.शरीर "कमी' मध्ये स्वस्थ रहायला तयार असतं,मनाची मात्र 'कमी' मध्ये एक प्रकारची 'घुसमट' होत असते.शरीर हे एका रेषेमध्ये जगते तर मन मात्र 'वर्तुळात' फिरते.शरीराला तृप्त करणे सोपं असतं,मनाच्या शब्दकोषात 'तृप्त' हा शब्दच नाही.शरीराला गणिताची भाषा समजते तर मनाच्या जगात मात्र सगळचं 'अगणित' असतं.
शरीर हे सुखरसिक तर मन मात्र एक प्रकारे दु:खरसिक सारखं असतं कारण जे मन सुखाची मागणी करतं तेच मन दुसरीकडे दु:ख निर्माण करतं.प्रसन्नता हे मनाचं मागणं तर ऊद्विग्नता हे मनाचं सर्जन असतं.सुख मिळविणेसाठी आपले मन जो मार्ग दाखवेल त्या मार्गाने चालतांना सफलता मिळू शकते.शरीराला जर सागर मानलं तर मन मात्र आकाश प्रमाणेच असेल.सागर कितीही विराट असला तरीही पार करून किनारा गाठू शकतो,आकाश मात्र अनंत आहे त्याला कोठेही अंतिम मर्यादा नाही.त्याप्रमाणे शरीराच्या वाटेल तेवढया गरजा असल्या तरी त्यांना अंतिम शेवट असतोच,मन मात्र इच्छापुर्ती होण्याचं नावच घेत नसते.'इच्छाचं' शरीर इतकं मोठं असतं की ते सगळया जगाच्या कपडयांनी देखील झाकता येऊ शकत नाही.
"मी" च्या अस्तित्वाला टिकवून ठेवायला इच्छापुर्तीच्या मागे सतत पळत राहण्याची गरज नसते कारण एकदा गरजा पुर्ण झाल्या की "मी" म्हणजे शरीर टिकून राहते.पण मनाचा स्वभाव पाहता,मनाला कितीही मिळालं तरी मन अतृप्तच राहते.लागलेली आग सर्व भक्ष्य गिळूनच शांत होते,माणसाचे मन मात्र जगभरची संपत्ती,सत्ता,सामग्री मिळूनही अतृप्तच राहते.अथक प्रयत्नांनी जेवढं पदरी पडलं तेवढं आनंदाने स्विकारणे यात आली समाधानाची भूमिका.जास्त..अजून थोडं जास्त मिळवत राहण्याच्या 'हावरटपणापासून' आपले मन मुक्त ठेवणे म्हणजे ती झाली खर्रया सुखाची भूमिका !
जीवनाची मजा सतत कुठे ना कुठे भटकत राहण्यात,भ्रमात राहण्यात नाही तर कुठे तरी थांबण्यातच खरी मजा असते.मनाचं ऐकत राहून लोभ,स्वार्थ जोपासण्यात सारा वेळ गेला असेल तर आता काही काळ समाधानी वृत्ती जोपासावी,सतत धावपळीच्या जीवनात काही क्षण शांत थांबून राहीले पाहीजे.इच्छापुर्तीसाठी जीवनाचा अतिमुल्यवान वेळ वाया गेलाही असेल तर आता मात्र वेळेचा सदुपयोगाकडे झुकले पाहीजे.मन जिकडे पळत असेल तिकडे शरीराला पळवत ठेवणे बरोबर नसते.
" गरीबी थोडंस मागते,विलास खुप मागतो आणि लोभ तर खुपच सारं काही मागतो पण 'मन' किती मागतो हे समजतच नसतं म्हणून "गरजपुर्ती मन आपल्या काबुत ठेवा". !!!
........... जी.टी.टाक....
जेष्ठ पत्रकार
कळमसरे,ता.अमळनेर 9545744490
.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.