अमळनेर : दोन वर्षापूर्वीचे शेतकरी खरीप हंगाम चे दुष्काळी अनुदान मिळाले नाही तर नाईलाजस्तव तहसील कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा इशारा मांडळ येथील शेतकरी दाम्पत्याने दिला आहे
मांडळ येथील शेतकरी भास्कर माणिक पाटील व भारती भास्कर पाटील यांनी खरीप हंगाम 2018 - 19 चे दुष्काळग्रस्त अनुदान मिळण्यासाठी मांडळ येथील तलाठी यांच्याकडे चार चार वेळेस आधार कार्ड व बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स प्रत देऊन सुद्धा त्यांनी अनुदान मिळण्याच्या सुरुवातीच्या याद्यांमध्ये समाविष्ट केलेले नाही त्यामुळे आम्हाला अनुदान मिळू शकले नाही तरी लवकर अनुदान न मिळाल्यास मला नाईलाजास्तव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल असा इशारा भास्कर पाटील व भारती पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे