Halloween party ideas 2015



देशसेवा करणाऱ्या सैनिकांने रूबजी नगर भागातील गरजूंना जिवनाश्यक वस्तूंचे वाटप करून घडविले माणूसकीचे दर्शन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाँकडाऊनमुळे दोन महीन्यापासून सर्व व्यवसाय बंद पडल्याने अनेक कुटुंबातील नागरीकावर उपासमारीची वेळ आली होती.पण शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी,भानूबेन गोशाळा यांच्या माध्यमातून जेवनाची व्यवस्था करण्यात आली होती. देशसेवा करीत असतांना आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडणे आपले नैतिक कर्तव्य आहे. याच भावनेतून मध्यप्रदेशात देशसेवा करणाऱ्या पण अमळनेर येथील रहीवाशी किशोर बडगुजर यांनी आपला मित्र तुषार सोनार यांच्या मदतीने रूबजीनगर येथील गरजूंना जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांच्या या सामाजिक बांधीलकीला सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सविस्तर माहिती अशी कि मध्य प्रदेश येथे देशसेवा करणारे अमळनेर चे सुपुत्र इंडियन आर्मीत कार्यरत असलेले किशोर बडगुजर यांनी तुषार सोनार यांच्या मदतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रुबजी नगर भागातील पंचवीस विधवा महिला कुटुंबांना तांदूळ गहू वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले देशसेवे सोबत समाजसेवेचे अप्रतिम उदाहरण किशोर बडगुजर यांनी घडविले यावेळी सोशल डिस्टंटचे पालन करत राकेश साळी मनोज शिंगाणे भाऊसाहेब महाजन बंटी शिंगाणे पप्पू महाजन प्रवीण भोई यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.