Halloween party ideas 2015


*भातखंडे येथील योगगुरू विकास पाटील यांचे कोरोणा विषाणू विरुद्ध लढण्यासाठी युट्युब द्वारे प्रशिक्षण*

भातखंडे( प्रतिनिधी) भातखंडे येथील रहिवासी योगगुरू विकास जुलाल पाटील हे मुंबई या ठिकाणी मल्टिनॅशनल कंपनीतील अधिकारी वर्ग व अशा अनेक लोकांना योगाभ्यास मुंबई व मुंबई बाहेर ते नित्य नेमाने देत असतात कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच एक युट्युबवर व्हिडिओ जारी केलेला आहे. त्या माध्यमातून कोरोणा विषयांवर मात करण्यासाठी योगा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. योग अभ्यासाचे महत्त्व त्यांनी यातून सांगितलेले आहे .यात योग ही भारताची अति प्राचीन ज्ञानसंपदा आहे.
आधुनिक काळात योग या विषयावर जागतिक स्तरावर अनेक संशोधन झालेत. मानवाच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी योग अतिशय संपन्न विज्ञान असल्याचे सिद्ध झाले आहे. माणसाला होणाऱ्या कोणत्याही रोगाचं उगमस्थान हे मानवी मन असते. मानवी व्यक्तिमत्त्वाचे ५ अंग योगशास्त्रा मध्ये सांगितलेले आहेत. शरीर, मन, प्राण, बुद्धी, आत्मा इ.
आधुनिक मेडिकल सायन्स मध्ये फक्त शरीराचा इलाज केला जातो. परंतु आपल्या प्राचीन ज्ञान संपदेमध्ये वरील पाचही अंगांचा विचार केला जातो.
भारतातील जवळपास ९० टक्के लोक आरोग्यवर्धक झोप घेऊ शकत नाही. योग शास्त्रामध्ये योग निद्रा ज्याला शवासन या नावाने ओळखले जाते. शवासन चा अभ्यास कसा करावा यासाठी एक सुंदर व्हिडिओ प्रस्तुत केलेला आहे. पुढील लिंक वर क्लिक केल्यानंतर व्हिडिओ ओपन होतो.

https://youtu.be/c9b_kJDRySc

चांगल्या परिणामासाठी कानात एअर फोन लावूनच व्हिडीओ ऐकावा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडीओ ऐकावा तरच त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील.
योगनिद्रा किंवा शवासन चा अभ्यास केल्यास अवघ्या अठरा मिनिटात रात्रीच्या तीन तासाच्या झोपे येवढा आराम प्राप्त करू शकतात. मानसिक ताण-तणाव, निद्रानाश, चिंता, वैफल्य, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, चिडचिड, अर्धशिशी (migraine) सारख्या रुग्णांना शवासन च्या अभ्यासामधून मोठ्या प्रमाणात आराम मिळतो, व मानसिक ताकद वाढण्यास मदत होते.
सदर व्हिडिओ हा योग प्रशिक्षक विकास पाटील यांनी स्वतःच्या अनुभवातून आणि अभ्यासातून विकसित केलेला आहे. भारतीय योगशास्त्राचे महान तंत्र जनमाणसात पोहोचावे या पवित्र उद्देशाने बनवलेला आहे.योग ही भारताची अतिप्राचीन ज्ञानसंपदा आहे. त्यांच्या योगाभ्यासाच्या जोरावर परदेशांमध्ये योग प्रशिक्षणासाठी विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे त्यांनी कोरोणा विषाणूच्या महामारी विरुद्ध लढण्यासाठी रोज प्राणायाम योगाभ्यास नियमित केल्यास कोरीणा विषाणूची बाधा आपणापर्यंत येणार नाही असे त्यांनी अधोरेखित केलेले आहे. त्यांच्या या महान कार्याबद्दल भातखंडे वासियांना त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.