देवगांव देवळी हायस्कूल मध्ये महात्मा गांधी, व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी ता.अमळनेर येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूल मध्ये २आँक्टोबर महात्मा गांधी ,व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली.
अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.तर अतिथी शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन.आय.आर.महाजन,एच.ओ.माळी होते.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापुजन करून करण्यात आली.
सकाळी शाळेचा परीसर स्वच्छ करण्यात आला.महात्मा गांधी जयंतीचे औचीत्य साधून शाळेत सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून परीक्षा शनिवारी घेण्यात येणार आहे.त्यातुन "कोण बनेगा प्रज्ञावंत?यासाठी त्या विद्यार्थ्यांनची निवड केली जाणार आहे.ज्या गटातील विजेता गटाला पुस्तके बक्षीस म्हणून दिली जाणार आहेत. यासाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर यांनी विजेता गटातील विदयार्थीना दहा पुस्तके सानेगुरुजी व महात्मा गांधीची दिली आहेत.अजून शाळेतील शिक्षक पुस्तके देणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेत सहभागी होत आहे.परीक्षेला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन करीत असुन स्पर्धा प्रमुख म्हणून शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन काम पाहत आहेत.
शाळेचे शिक्षक सोनटक्के यांनी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन म्हणाले कि महात्मा गांधी, व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शाळेत विद्यार्थ्यांनसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात असून सामान्य ज्ञान परीक्षेच्या माध्यमातून विदयार्थीनच्या ज्ञानात भर पडुन कल्पना शक्तीला वाव मिळेल. असे सांगत.महात्मा गांधी यांनी आम्हाला सत्याचा मार्ग शिकवला तर लालबहादूर शास्त्री यांचे शेतकरी बांधवाबददलचे धोरण यावर सविस्तर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी तर आभार प्रर्दशन एस.के.महाजन यांनी कैले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.